द्वार भेद
आज शहरातील बहुतांशी सर्वच घरे द्वारभेद या दोषाने युक्त आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात काहीना काही तरी अडचणी निर्माण होतातच होतात. अडचणींच्या मागची कारणे काय हे माहित नसल्यामुळे आज प्रत्येक जण हताश-निराश झाला आहे.
वास्तू-शास्त्रामध्ये सुखी जीवनासाठी बऱ्याच सोप्या उपाय योजना सुचविल्या आहेत. प्रत्येकाने त्या समजून घेवून उपाय योजना केल्यास नक्कीच त्यांच्या जीवनात सुधारणा होईल.
द्वारभेद म्हणजे नक्की काय ते आपण समजून घेवूया.
१) मुख्य दरवाजासमोर मोकळी जागा असणे गरजेचे आहे, म्हणजे
पूर्वीच्या भाषेत आंगण असणं होय. कारण मुख्य दरवाजातून (प्रवेशद्वारातून) आपल्या
घरात विशिष्ट प्रकारची positive energy म्हणजे लक्ष्मी येत असते, येणारी लक्ष्मी
ही राजमार्गाने आली पाहिजे, सन्मानाने आली पाहिजे.
२) आपल्या दरवाजासमोर दुसऱ्याचा प्रवेशद्वार चालत नाही, ते वास्तुशास्त्रास मान्य नाही, जागा मोकळी पाहिजे.
३) मुख्य प्रवेशद्वारासमोर चढता-उतरता जिना चालत नाही, चढता जिना असेल तर अडचण त्यात झाली पाहिजे, उतरता जिना असेल तरी चालत नाही, कारण खाली खड्डा आला, नुकसान जास्त होते.
४) दरवाजासमोर किंवा बाहेर कमीत कमी १० ते १५ फुट अंतर पाहिजे नाहीतर positive energy कमी होईल त्यामुळे चांगल्या संधी येण्याचं प्रमाण कमी होऊन प्रगती होणार नाही.
५) वास्तुशास्त्रात lift मान्य नाही, lift असणं हे आपल्या घराच्या दृष्टीने negative आहे.
६) दरवाजासमोर भिंत आली तरी अडचणी येतात.
७) एखाद्याचं घर, दुकान, रस्त्याला लागून आहे व घर व दुकानासमोर झाड, गटार, इलेक्ट्रीक खांब, कचरापेटी, इलेक्ट्रीकची लाल डिकी, दरवाजासमोर मंदिर, हॉस्पिटल असे काही आले म्हणजे त्याला द्वारभेद झाला असं म्हणतात, म्हणजे मुख्य दरवाजासमोर अडचण आली व ती घरात येते.
८) मुख्य दरवाजाच्या बाजूला चप्पल रॅक नको, आत व बाहेर मोकळी जागा पाहिजे, तसं नसेल तर common वास्तुदोष आहे, ह्याला पर्याय एक, ओपन स्पेस – तेथून चप्पलेचे कपाट हलवा, दूर ठेवा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा