पोस्ट्स

मे, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुखी संसाराची गुरुकिल्ली

सुखी संसाराची गुरु किल्ली पत्नी :- अहो ऐकलं का, येताना भाज्या आणा आणि हो किराणावाल्याचे पैसेही राहिले आहेत तेही देवून या , परवा इस्त्रीला कपडे दिले होते तुमचे पण त्या इस्त्रीवाल्याने अजून कपडे दिले नाहीत, उद्या तुम्हाला ऑफिसला घालून जाण्यासाठी एकही ड्रेस नाही, नाहीतर ऐनवेळी आकांड-तांडव कराल, तेव्हा इस्त्रीवाल्याला अजून ड्रेस का नाही दिले असेहि विरून या, ऐकताय ना, मी काय सांगितले ते. पती :- हो ग बाई, कान देवून ऐकतोय, त्याशिवाय काय करू शकतो. अजून काही राहिलं का सांगायचं. पत्नी :- अरेच्चा एक सांगायचं विसरलीच की, अहो आज जाधव काकूंच्या नातवाचा वाढदिवस आहे, आपल्याला त्यांनी आवर्जून बोलावलं आहे, जेवण सुद्धा आहे आज त्यांच्याकडे, उगाच फुकटच खावून गेले असे नको वाटून द्यायला, तर मग एक छानसं छोटस गिफ्टहि घेवून या. पती :- बर बर, आणतो. आता एका तासात निघेन ऑफिस मधून, मार्केट मध्ये गेलो की फोन करतो तुला (आणि फोन कट करतो). पती (स्वता:शी) :- देवा गणपती बाप्पा, किती हा त्रास पुरुषांना, हो हो खासकरून लग्न झालेल्या पुरुषांना. एकीकडे ऑफिसच टेन्शन आणि एकीकडे बायकोच, आज काय कामे सांगते ...